प्रस्तावना
पंचायत समिती, कामठी ची स्थापना दिनांक 1 मे 1962 रोजी महाराष्ट्र/कामगार दिनाच्या दिवशी झालेली आहे. पंचायत समिती अंतर्गत एकुण 76 गावे असुन यामध्ये 2 रिठी गांवाचा समावेश आहे. एकुण ग्राम पंचायतींची संख्या 47 आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार तालुक्याची ग्रामिण भागातील एकुण लोकसंख्या 1,18,139 आहे. पंचायत समिती, कामठी अंतर्गत एकुण 4 जिल्हा परिषद गट व एकुण 8 पंचायत समिती गण आहेत. पंचायत समिती, कामठीने शासन राबवित असलेल्या यशवंत पंचायत राज अभियानामध्ये जवळपास दरवर्षीच भाग घेतलेला आहे. या अभियानातंर्गत अ.क्रमे सन 2015, सन 2017, सन 2018-19 व सन 2019-20 या वर्षात पात्र ठरुन पुरुस्कार प्राप्त केलेले आहेत. पंचायत समिती, कामठी ही जिल्हयातील एकमात्र ISO ९००१-२०१८ QUALITY MANAGEMENT SYSTEM [QSM] मानाकिंत पंचायत समिती आहे. पंचायत समिती, कामठी अंतर्गत 2 प्राथमिक आरोग्य केन्द्रे असुन त्याअंतर्गत एकुण 22 उपकेन्द्रे आहेत. पशुवैद्यकिय चिकीत्सालय एकुण 7 असुन यापैकी श्रेणी-1 ची 3 व श्रेणी-2 ची 4 पशुचिकीत्सालय आहेत. जिल्हा परिषदेच्या एकुण 80 प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आहेत. पंचायत समितीचा मुख्य उद्देश शासन राबवित असलेल्या विविध व सर्व प्रकारच्या ग्रामिण भागाकरिता योजना या ग्रामिण भागात ग्राम पंचायती मार्फत ग्रामिण जनतेपर्यन्त पोहचवुन ग्रामिण भागाचा विकास करणे हा आहे. पंचायत समितीमध्ये अधिकारी/कर्मचाऱ्यांकरिता सुसज्ज असे ग्रंथालय असुन या ग्रंथालयामध्ये विविध प्रकारचे पुस्तके वाचन करण्याकरिता ठेवण्यात आलेली आहे. पंचायत समिती, कामठी नाविण्यपुर्ण योजना राबविण्यास नेहमीच अग्रेसर आहे.


